Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha

Continues below advertisement

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अद्यापही भिजत घोंगडं...काही जागांवर अद्यापही तिढा असल्याची माहिती...जास्त खेचू नका, राज ठाकरेंनी मनसे नेत्यांसह संजय राऊत आणि अनिल परबांना सूचना केल्याची माहिती...

काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोकाट प्रयत्न सुरू...सेनेची काँग्रेस हायकमांडशी शेवटची चर्चा सुरू असल्याची माहिती...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची वंचितसोबत आघाडी होण्याची शक्यता, काँग्रेस नेत्यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा.

नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा डंका.. २८८ पैकी तब्बल ११७ शहरांमध्ये नगराध्यक्ष विजयी. भाजपा ठरला नंबर १चा पक्ष.. तर शिंदेंची शिवसेना ५३ नगराध्यक्षांसह दुसऱ्या स्थानी.. 

नगर परिषद, नगर पंचायतीतील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट, महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा, मोदींकडून कौतुक.

भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा आज नागपुरात सत्कार...मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola