Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

Continues below advertisement

Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवकबनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
लोणावळ्यात फळ विक्रेती भाग्यश्री जगतापांवर मतदारांनी मोठा विश्वास दाखवलाय. त्यांचं नगरसेवक होण्याचं 'भाग्य' मतदारांनी उजळून टाकलंय. पण नगरसेवक झाल्यानंतर भाग्यश्री हुरळून गेल्या नाहीत. निकालाला चोवीस तास उलटायच्या आतचं भाग्यश्री यांनी पुन्हा फळ विक्रीला प्राधान्य दिलंय. दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरुचं ठेवणार आणि मतदारांचा विश्वास ही सार्थ ठरवणार. असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांना ही आपण नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा चाखतोय, हे पाहून सुखद धक्का बसला. राजकारणाच्या बाजारातील हे सकारात्मक चित्र पाहिलं की आपली लोकशाही अजून ही किती भक्कम आहे, हे यातून अधोरेखित झालं. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 22 DEC 2025 :

माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा, शिक्षेला स्थगिती, सुनावणी होईपर्यंत आमदार म्हणून अपात्र ठरवणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट...सेना-मनसेच्या युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी चर्चा...लवकरच युतीचा मुहूर्त जाहीर होण्याची शक्यता...
मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रत्येक कागदपत्रांवर पार्थ पवारांची सही... अजंली दमानिया यांनी कागदपत्रांसह दाखवले पुरावे, मुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांना वाचवत असल्याचा आरोप...
पुणे महापालिकेत अजित पवार आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता...अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून प्राथमिक केल्याची माहिती...दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा 
ठाकरे भावांची युती उद्याही होऊ शकते, खासदार संजय राऊतांचे संकेत...वाजत गाजत, गुलाल उधळत एकत्रित युतीची घोषणा होणार, राऊतांची माहिती...काँग्रेसलाही सोबत येण्याचं आवाहन...


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola