Zero Hour ABP Majha : ईडीच्या कोठडीत का होते मलिक; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha : ईडीच्या कोठडीत का होते मलिक; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस घंटा वाजायच्या आधीच तापू लागला. एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक...
मविआ सरकार बनत असताना आणि सत्तेत आल्यावर ज्यांनी किल्ला लढवला, भाजपवर अखंड तुटून पडण्यात संजय राऊत यांच्यासोबत नबाव मलिक हे नाव सुद्धा अग्रेसर होतं. त्यामुळे भाजपने सुद्धा मलिकांवर हल्ले करणं सोडलं नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली, जवळपास दीड वर्ष ते तुरुंगात होते. देशद्रोह्यांशी, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी, दाऊद इब्राहीमशी-अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. नवाब मलिकांच्या पैशाचा ट्रेल, टेरर फंडिंगचा अँगल त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत पोटतिडकीने महाराष्ट्राला समजावून सांगितला होता. चारच महिन्यापूर्वी नवाब मलिक तब्येतीच्या कारणावरुन अंतरिम जामीनावर बाहेर आले. मधल्या काळात राज्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या. अजितदादांनी वेगळी चूल मांडत भाजपसोबत घरोबा केला, थेट सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे नवाब मलिक दादांसोबत की काकांसोबत हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्याचं क्लिअर कट उत्तर आज मिळालं. देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा.. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असलेले नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात थेट सत्ताधारी बाकांवर दिसले. काही महिन्यापूर्वी मलिकांची पाठराखण करणारी उद्धव ठाकरे गटातील नेते त्यांनी बाजू बदलताच आज मलिकांवर टीका करताना दिसले तर मलिकांच्या टेरर फंडिगचं गणित महाराष्ट्राला समजावून सांगणारे देवेंद्र फडणवीस आज मलिकांवरील टीकेला उत्तर देताना दिसले.