Zero Hour Pravin Darekar : आपला तो बाब्या दुसऱ्याचं कारटं? दुबार मतदार यादीवरुन विरोधकांवर टीका
abp majha web team | 03 Nov 2025 09:22 PM (IST)
दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर, या चर्चेत भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पक्षाची भूमिका मांडली. दरेकर यांनी 'तुमचा लोकसभेत पराभव झाला होता' असे म्हणत शेलार यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार, लोकसभेत विरोधकांना २ कोटी ५० लाख तर सत्ताधाऱ्यांना २ कोटी ४८ लाख मते मिळाली आणि सुमारे २.२५ लाख मतदार दुबार होते. हे मतदार विशिष्ट समुदायाचे असून त्यांच्यामुळेच विरोधकांना विजय मिळाल्याचा आरोप भाजपने केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या मतदारसंघातील विजयाचे मताधिक्य हे दुबार मतदारांच्या संख्येपेक्षा कमी असल्याचेही शेलार यांनी म्हटले होते.