Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

Continues below advertisement

नाशिकमधल्या तपोवनमधली झाडं तोडण्याचा वाद विकोपाला...झाडाला मिठी मारता, बकरी ईदला बकरीला का नाही, नितेश राणेंचा पर्यावरणवाद्यांना सवाल...तर, वृक्षतोड साधूसंतानांही आवडणार नाही, सयाजी शिंदेंचा ठाम विरोध...

मुंबईतील गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव...मुस्लीम विद्यार्थ्यांचं आंदोलन..तर परवानगी दिल्यास हिंदुत्ववादी संघटनांचा आंदोलनाचा इशारा...

तहानंतरही शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून फोडाफोडी...डोंबिवलीतल्या दोन बड्या नेत्यांच्या हाती कमळ...अॅक्शनला रिअॅक्शन होणारच, शिरसाटांचा इशारा...

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानींची कोर्टात सुनावणी..१४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी..तर कोणताही व्यवहार झालाच नाही,  तेजवानीच्या वकिलांचा दावा...

बहारिनमध्ये जय पवारच्या लग्न सोहळ्याला सुरूवात...शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पवार अनुपस्थित...युगेंद्र पवार नववधूसह लग्नासोहळ्याला जाणार...

पंकजा मुंडेंच्या पीएची पत्नी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन...अंजली दमानियांनी गौरीच्या पालकांसह घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट...

पुण्यातील महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकरला एबीपी माझाच्या बातमीचा दणका...इंजिनियर दीपक डोळस यांना परत करणार १४ कोटी, महिला मांत्रिकेकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीन पुतीन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर...संरक्षण, सायबर, अणुऊर्जासह अनेक प्रकल्पांसाठी पुतीन यांचा दौरा महत्त्वाचा, तर विरोधी पक्षनेत्याला विदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटू दिलं जात नसल्याचा राहुल गांधींचा आरोप

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola