Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
आता बातमी आहे ड्रेसकोडवरून उफाळलेल्या वादाची...
मुंबईतील गोरेगावच्या विवेक कॉलेजच्या परिसरात आणि वर्गात, बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय... हिजाब आणि बुरख्याला बंदी घातल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींनी, कॉलेजबाहेरच आंदोलन सुरू केले...
तर हिजाब आणि बुरख्याला परवानगी दिल्यास, हिंदुत्त्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला.. दोन्ही बाजूचे लोकं आमनेसामने आल्याने, कॉलेजबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं... त्यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनींना ताब्यात घेतलं..
या वादात मनसेनंही उडी घेतली.. शिष्टमंडळानं शाळा प्रशासनाची भेट घेतली. हिजाब आणि बुरख्याची मागणी चुकीची असून त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेनं दिलाय. तर बजरंग दलानंही याप्रकरणी आपला विरोध दर्शवलाय..
गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्याविरोधात घेतलेल्या निर्णयाचं, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी स्वागत केलंय..