Zero Hour Pradeep Sharma on Powai case : १७ मुलांना वाचवण्यासाठी झालेली चकमक कायद्याने योग्य?
abp majha web team | 30 Oct 2025 09:10 PM (IST)
एबीपी माझावर झालेल्या चर्चेत, माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी मुंबईतील पवई येथे झालेल्या चकमकीवर भाष्य केले. या घटनेत रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवले होते, ज्याची पोलिसांनी सुटका केली आणि चकमकीत तो मारला गेला. यावर शर्मा म्हणाले, 'स्वतःच्या रक्षणासाठी, किंवा कोणी किडनॅप झालं असेल त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जर हल्लेखोराचा मृत्यू झाला तर ते सेक्शन हंड्रेड आयपीसीनुसार जस्टिफाईड आहे'. मुलांच्या सुटकेसाठी पोलिसांना बळाचा वापर आणि फायरिंग करणे हे कायद्यानुसार पूर्णपणे योग्य होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. टीव्ही रिपोर्टनुसार, वाघमारे नावाच्या अधिकाऱ्याने मुलांना वाचवण्यासाठी गोळीबार केल्याचे त्यांनी नमूद केले.