Zero Hour Sandeep Deshpande : दुबार मतदाराला कोणतीही जात नसते;संदीप देशपांडेंचा भाजपला प्रत्युत्तर
abp majha web team | 03 Nov 2025 09:26 PM (IST)
सदोष मतदार याद्या आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीत मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 'अतिरेक्याला जसा कुठला जात, धर्म नसतो, तसं दुबार मतदाराला कुठले जात, धर्म, भाषा काही नसते,' असे म्हणत शेलार यांच्या आरोपांना उत्तर देण्यात आले आहे. बोगस मतदाराला जाती-धर्माचे लेबल चिकटवून पळवाट शोधण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप या चर्चेत करण्यात आला. सर्वच पक्ष मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य करत असल्याने, या सदोष याद्या दुरुस्त करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी एकमुखी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.