Zero Hour Harun Khan : आगामी निवडणुका मविआ एकत्रित लढणार
abp majha web team | 16 Oct 2025 09:38 PM (IST)
शिवसेना (UBT) आमदार हारून खान (Haroon Khan) यांनी ठाकरे बंधूंच्या (Uddhav Thackeray, Raj Thackeray) एकजुटीवर आणि मुंबई महापौरपदाच्या (Mumbai Mayor) आगामी निवडणुकीवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 'दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून लोकांच्या पोटात दुखी फुटपुष्के लागलेले आहेत,' असं म्हणत हारून खान यांनी विरोधकांना टोला लगावला. शिवाजी पार्कमधील कंदिलांवर दोन्ही भावांची छायाचित्रे असण्यामागे बंधुत्वाचा संदेश असून त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले. मनसेला (MNS) महाविकास आघाडीत (MVA) घेण्याचा निर्णय एकत्रितपणे झाला असून सर्व पक्ष एकत्रच निवडणूक आयोगाकडे गेले होते, त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. ‘महापौर शिवसेनेचा होणार’ या बॅनरचा अर्थ महाविकास आघाडीचाच महापौर होणार, असा आहे आणि तो एकजुटीचा संदेश आहे, असेही खान यांनी स्पष्ट केले.