Zero Hour Shaina NC : रोहित पवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात हजारो बोगस मुस्लिम मतदार
abp majha web team Updated at: 03 Nov 2025 09:30 PM (IST)
बोगस आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी (Shaina NC) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'आशिष शेलार साहेबांनी हे उजागर केलं की रोहित पवारच्या (Rohit Pawar) जामखेड कंस्टिट्युएन्सी मधे पाच हजार पाचशे डबल डुप्लिकेट मुस्लिम वोट्स आहे, तर तिथे तुमची चुप्पी,' असा थेट सवाल शायना एनसी यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्या मतदारसंघात ५०० आणि वरुण देसाई (Varun Desai) यांच्या वांद्रे येथील मतदारसंघात १३,३०० मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार असल्याचा दावाही केला. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाचे काम हाती घेतले असून, त्यात दुबार नावे, मृत मतदार आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेला विरोध का केला जात आहे, असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत केवळ दोन लाख कमी मते मिळाल्याचा संदर्भ देत, मतदारयादीतील हा गोंधळ दूर करणे आवश्यक असल्याचे मत शायना एनसी यांनी मांडले.