Zero Hour Sarita Kaushik : मतदार यादीतला घोळ, राजकारण तापलं; एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
abp majha web team | 03 Nov 2025 09:38 PM (IST)
एबीपी माझाच्या 'झीरो अवर' (Zero Hour) या कार्यक्रमात कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी मतदार यादीतील घोळाच्या राजकारणावर संपादकीय भूमिका मांडली. 'याद्या दाखवत त्यांनी (आशिष शेलार) विरोधी आमदारांच्या यशावरच संशयाचं धुकं अंथरलं आणि मॅच नबॉल्ड केला.' विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळ हा सत्तेत येण्यासाठी शिजवलेली डाळ असल्याची शंका निर्माण केली होती, पण भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. शेलार यांनी विरोधकांच्याच विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत 'आमचे पाटील भोईर तर तुमचे शेख खान' असे म्हणत याद्यांमधील नावांचा उल्लेख करून या वादाला एक नवीन तोंड फोडले. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे भ्रष्टाचार, रोजगार आणि विकास यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित होऊ नये, असे मत सरिता कौशिक यांनी व्यक्त केले.