Sanjay Raut Is Back : संजय राऊतांचं कमबॅक, विरोधकांना डोकेदुखी Special Report
गेले महिनाभर ज्यांची उणीव महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच जाणवत होती, त्या संजय राऊतांनी आज ब्रेकनंतरची इनिंग सुरु केलीय. नव्या इनिंगची सुरुवात त्यांनी केली शिंदेसेनेपासून. शिंदेसेनेचा कोथळा कोण आणि कसा काढणार इथपासून ते काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी जोरदार बॅटिंग केली. तर फडणवीस आणि शिंदेंपासून अनेकांनी राऊतांना सल्ले देत त्यांच्या कमबॅकचं स्वागत केलं. पाहूया, राऊतांच्या कमबॅकचा हा स्पेशल रिपोर्ट.
आजारपणाच्या सुट्टीवर असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हळूहळू बरे होतायत.
दोन महिने आजारपणाच्या सुट्टीवर जाण्याची घोषणा राऊतांनी केली होती.
प्रत्यक्षात मात्र एकाच महिन्यात ते परत आलेत.
आल्याआल्या आपल्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या सर्वांना त्यांनी त्यांच्या आजाराचं मूळ सांगून टाकलं.
आम्ही लढणार, असं म्हणत राऊतांनी लढाईला सुरुवात केलीय तीच कोथळ्याच्या मुद्द्यावरून.
भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेचा कोथळा कसा काढला जाणार, हे त्यांनी आकडेवारीसह सांगून टाकलंय.
कमबॅकनंतर राऊतांनी केलेल्या या पहिल्याच आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया बोलकी आहे.
राऊतांच्या आरोपांवर शिंदेंनी तोंड उघडलं नाही. फक्त हात जोडले.
आजारपणातून उठून थेट कोथळ्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेही नेहमीच्या त्वेषानं व्यक्त झाले नाहीत.
काहींनी राऊतांना शुभ बोलण्याचा सल्ला दिलाय, तर काहींनी तब्येतीची काळजी घेण्याचा.
मुख्यमंत्र्यांनी राऊतांची तब्येत सुधारल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.
मात्र त्यांच्या आरोपांना उत्तर न देण्याचा सिलसिला कायम राखत..
नगरपालिका प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कमबॅक करणाऱ्या राऊतांनी निवडणुकीतल्या पैशांच्या वापरावरून महायुतीला टार्गेट केलंय.
मुंबईत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसलाही संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत टोला लगावलाय.