Nagarparishad Election : शिंदे, अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार-सूत्र

Continues below advertisement

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान (Maharashtra Election) भाषेचे ताळतंत्र सोडणाऱ्या आणि मतदारांना प्रलोभने देणाऱ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांना प्रलोभने देणारी वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांना प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ याचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे या बड्या नेत्यांची अडचण आता वाढणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याच वक्तव्य, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं वक्तव्य, एकनाथ शिंदे यांच्याकडून तिजोरीच्या चाव्यांचे वक्तव्य, चित्रा वाघ यांच्याकडून 'खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटण' अशी वक्तव्यं करण्यात आली आहेत. आता याच वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता तपास केला जाणार आहे. असे 20 नेते आहेत ज्यांच्या वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola