VIDEO | बेरोजगारीच्या उच्चांकाचं पाप कोणाचं? | माझा विशेष | एबीपी माझा
सरकारने अजूनही जाहीर न केलेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2017-18 यावर्षी देशाचा बेरोजगारीचा दर हा तब्बल 6.1 टक्के इतका होता. हा दर गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक असल्याचा दावा या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे वर्ष नोटाबंदीनंतरचं वर्ष आहे. नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते. या विषयी आज माझा विशेषमध्ये चर्चा!