Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
उत्तर प्रदेशात योगी आदित्यानाथ यांचं सरकार आहे. तिथे हिवाळी अधिवेशनात जातींच्या दबावतंत्रानं वातावरण तापलंय. ठाकूर, क्षत्रिय, कुर्मी समाजापाठोपाठ लखनौमध्ये सर्वपक्षीय ब्राह्मण आमदारांचं स्नेहभोजन पार पडलं. त्यात सर्वाधिक वाटा भाजपच्या ब्राह्मण आमदारांचा होता. ९ ते १० टक्के मतदार आणि ४० ते ५० ब्राह्मण आमदारांना भाजप गृहित धरतंय असा नाराजीचा सूर बैठकीत होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या जातीला जास्त झुकतं माप देतात असा आरोपही केला जातोय. पाहुयात हा रिपोर्ट
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत.
हिवाळी अधिवेशन सुरु आहे आणि राजकीय वातावरण आत्तापासूनच तापायला सुरुवात झालीय
त्यात आधी क्षत्रिय नंतर कुर्मी समाजाच्या आमदारांनी कौटुंबिक स्नेहभोजन करत शक्तीप्रदर्शन केलं
आता सर्वपक्षातल्या ५० पेक्षा जास्त ब्राह्मण आमदारांची बैठक लखनौमध्ये पार पडली,
त्यात सत्ताधारी भाजपच्या ब्राह्मण आमदारांची संख्या जास्त असल्यानं खळबळ उडाली
या स्नेहभोजनाचं आयोजन भाजपचे आमदार पीएन पाठक यांनी केलं होतं
उत्तर प्रदेशात शक्तीशाली मानला जाणारा ब्राह्मण समाज
योगी सरकारवर आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.
- उत्तरप्रदेश ब्राह्मण मतदार ९ ते १० टक्के
- १२ जिल्ह्यांमध्ये ब्राह्मण समाज १५ टक्क्यांपेक्षा जास्त
- ११० विधानसभा मतदारसंघात ब्राह्मणांची मतं निर्णायक
- ८९ टक्के ब्राह्मण समाजाचं भाजपला मतदान
- भाजप आमदार पीएन पाठक यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनासाठी सर्वपक्षीय ५२ ब्राह्मण आमदारांची उपस्थिती
- बंद दाराआड चर्चा करत शक्तीप्रदर्शन
- त्यात ४० पेक्षा जास्त भाजपचे आमदार, भाजपमध्ये आवाज दाबला जात असल्याची भावना
- ठाकूर विरुद्ध ब्राह्मण सुप्त संघर्षामुळे
वाढता असंतोष