अरबी समुद्रातील चक्रवादळामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट, 16-17 मे रोजी कोकणात अतिमुसळधारचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2021 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.