Demonetization ला 5 वर्षे पूर्ण होत असताना नागरिकांकडची रोकड उच्चांकी स्तरावर, नोटबंदीनंतरही रोकड वाढली?
abp majha web team
Updated at:
08 Nov 2021 10:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला म्हणजे आज नोटबंदीच्या एका निर्णयानं संपूर्ण देश अवाक झाला होता. नोटबंदी का आवश्यक याचे अनेक दाखले दिले गेले होते. त्यापैकी एक म्हणजे यामुळे रोख व्यवहार कमी होऊन काळा पैसा चलनात येणं कमी होईल. पण आता पाच वर्षानंतर जे चित्र दिसतंय ते उलटंच. कारण ताज्या आकडेवारीनुसार देशात लोकांकडची रोकड वाढत चालली आणि ती आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहचली आहे.