NCP Awhad Special Report : आव्हाडांनी का केली राजकारण सोडण्याची भाषा, चिमण्यांनो ... परत फिरा रे?
abp majha web team
Updated at:
08 Jul 2023 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२१ जून ही तारीख कायम लक्षात राहिल... याच दिवशी २०२२ साली महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना हादरवणारी घटना घडली होती... ती म्हणजे शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांचा बंड... या बंडाला वर्ष होत नाही तोवर २ जुलैला राष्ट्रवादीत उभी फूट पडली.. दोन पक्ष दोन गटात विभागले गेले.. आणि सुरु झाली आरोप- प्रत्यारोपांची कुस्ती.. कधी शिवराळ भाषेत टीका होवू लागली तर कधी थेट धमकावणारी भाषा वापरली जावू लागली.. राजकीय संस्कृती खालावल्याचा रोज नवा ऍपिसोड महाराष्ट्रासमोर येवू लागला..कालपर्यंत जे तावातावात बोलत होते त्यांनी आता थेट बॅकफूटवर येत फुटीचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्या नेत्यांनी माघार घेण्याची भाषा केलीये. पेटलेलं राजकारण विझवण्याचा प्रयत्न कुणाकडून केला जातोय पाहूया..