ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News

Continues below advertisement

जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या भीतीने ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसनं उडवलं, ११ जण दगावल्याची प्राथमिक माहिती तर अनेक जण गंभीर जखमी 
जळगावच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर...जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती  
आता वाल्मिक कराडची सर्व आरोपींसह एकत्र चौकशी होणार, मकोका प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,  कराडला वैद्यकीय उपकरणं वापरण्याची मुभा 
विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्हीनं टिपलेली व्हीडिओ क्लिप एसआयटीनं घेतली ताब्यात, क्लिप ताब्यात घ्यायला विलंब झाल्याचा सूर, कराड गँगसोबत पोलीसही असल्यानं धनंजय देशमुखांचा सवाल 
देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडीओ कॉल..तर धनंजय मुंडेंचा एकदाही फोन आला नाही, धनंजय देशमुखांचा नाराजीचा सूर, पालकमंत्री झालेल्या अजितदादांनाही जाब विचारणार 
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्डेड म्हणून जाहीर, अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न  सापडल्याने फरार घोषित, ठावठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram