दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅलीत शांततेचा मार्ग का सोडला? दिल्लीत दिवसभरात काय काय घडलं?
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2021 01:36 AM (IST)
Farmers Tractor Rally : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.