काय आहे मृग नक्षत्रातील 'राखण' प्रथा? 21व्या शतकातही अनोखी परंपरा जपणारी कोकणातली गावं!
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
17 Jun 2021 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे . कोकणात मृग नक्षत्राच्या सुरवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबडयाचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. मालवणी पध्दतीने आपलं गारांह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.