High Court On MNC Special Report : हायकोर्टानं सहा महापालिकांना खड्ड्यांवरुन झापलं
abp majha web team | 11 Aug 2023 08:33 PM (IST)

रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे लोकांचं, वाहनचालकांचं होणारं रोजचं मरण, यासोबतच जगणं सुरु आहे... ना राजकारणी या मुद्द्याकडे गांभीर्यानं बघत ना पालिका यावर ठोस भूमिका घेत... त्यामुळे आता दाद मागायची तरी कुणाकडे? असं विचारुन नागरिक शांत बसत आले... आज न्यायालयानं याची दखल घेत सहा महापालिकांचे कान उपटले.... हायकोर्टानं सहा महापालिकांना खड्ड्यांवरुन झापलं... इतकंच नाही तर हायकोर्टानं महापालिका आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली.