अतिवृष्टीमुळे उभं पीक आडवं, काहींच्या शेतजमिनींचं तळंच झालं, जगायचं कसं हा बळीराजासमोर प्रश्न #Latur
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2020 12:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.