Thane Railway Station Special Report : कोटींचा निधी मंजूर; पुनर्विकासाची प्रक्रिया कधी ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane Railway Station Special Report : कोटींचा निधी मंजूर; पुनर्विकासाची प्रक्रिया कधी ? ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग अजूनही रखडलेला आहे. रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या पुनर्विकास यादीमध्ये ठाणे स्थानकाचं नाव होतं. पण अजूनही त्या स्थानकाच्या कामास सुरुवात झालेली नाही. इतकंच काय तर निविदा प्रक्रियाही राबवण्यात आलेली नाही. या स्थानकातून रोज सात लाखाहून अधिक प्रवासी येजा करतात. त्यामुळंच ठाणे स्थानकात बहुमजली पार्किंग, तीन कमर्शियल टॉवर, फलाट आणि स्थानकाच्या आवारात विविध सोयसुविधा उभारण्यासाठी ९८३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. पण प्रत्यक्ष कामास अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळं ठाणेकर आणि ठाणे स्थानकाचा वापर करणारे प्रवासी अजूनही सोयीसुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.