ठाणे-बोरिवली लवकरच सुसाट...दोन तासांचं अंतर अवघ्या 15 मिनिटात, भूमिगत रस्त्याचं काम सुरू होणार
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
10 Aug 2021 07:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे बोरिवली भूमिगत रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आता भूसंपादन सुरू करण्यात येत आहे. या मार्ग झाल्यास 2 तासांचे अंतर 15 मिनिटांवर येईल. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग प्रस्तावित असल्याने याचे वन्य जीवांवर काय परिणाम होतील याचा अभ्यास करून मगच हा रस्ता बनवावा, अन्यथा कोर्टाची पायरी चढावी लागेल अशी भूमिका पर्यावरण प्रेमी संस्थांनी घेतली आहे. या विरोधामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.