ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

अल्पवयीन गुन्हेगारांचा वयाचा निकष घटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही  चर्चा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत माहिती, अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १८ वरुन १४ पर्यंत आणण्याचं सूतोवाच.. 

रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मत्स्य विभागासह पोलिस सज्ज, मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई 

कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला.. सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत खुला राहणार कोस्टल रोड

आरोपात तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्यानं केलेल्या कारवाईची चंद्रकांतदादांकडून उजळणी

बीडचा बिहार झाल्याच्या आरोपाचे परिणाम पुढच्या दोन पिढ्यांना भोगावे लागतील, गेवराईचे आमदार विजयसिंह  पंडित यांनी नाव न घेता सुरेश धसांना सुनावलं.. आमदारांनी जिल्ह्याची बदनामी करणं योग्य नसल्याचाही सल्ला

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार, गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी, सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार

फवारणीमुळे देवळ्यात शंभर एकरावरील कांदा पीक नष्ट.. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मध्यरात्रीच मेशी गावाच्या बांधावर, तातडीने नुकसान भरपाईचे आदेश.. औषधाच्या टेस्टिंगचेही आदेश

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram