सिंधुदुर्ग : दहा वर्षीय विजय तुळसकरला 20 देशांची राष्ट्रगीतं तोंडपाठ, तीन विदेशी भाषांवरही प्रभुत्व
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2021 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. याच मोबाईलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विजय तुळसकर तुळशीवृंदावनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील या मुलाने स्पॅनिश, इटालियन व जर्मन या देशाच्या भाषा डुलिंगो या अँप च्या माध्यमातून शिकल्या.
त्यासोबत लहानपणापासून संगीताची आवड असल्याने हार्मोनियमही उत्तम प्रकारे शिकला असून हार्मोनियम सरळ तर वाजवतोच मात्र उलट करून, उलट्या दिशेने, झोपून अश्या पध्दतीने तो एकही स्वर आजूबाजूला न करता उत्तम हार्मोनियम वाजवतो. 1111 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ. नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीतेही त्याच्या तोंडपाठ आहेत.