Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?
Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?
राष्ट्रवादी कडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी होते आहे. शिवसेना शिंदेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळून 12 मंत्रीपदांची मागणी केली आहे तर भाजपकडून 23 मंत्रीपदांची मागणी आहे दरम्यान सूत्रांची माहिती अशी आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात 1-1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे - राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे किंवा प्रफुल पटेल यांच्यापैकी एकाची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.. तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्ाची शक्यता आहे
हे ही वाचा.
कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होणार असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, 9 डिसेंबर रोजी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. राज्य सरकारचा विरोध असला तरी कोणत्याही परिस्थितीत हा मेळावा आयोजित केला जाईल असं महाराष्ट्र एकीकरण समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संबंधी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन हे बेळगावात होतं. त्या माध्यमातून बेळगाववर कर्नाटकचा दावा मजबूत करण्याची खेळी खेळण्यात आली आहे. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगावात अधिवेशन नको असं महाराष्ट्र एकीकरण समितीचं म्हणणं आहे. त्यामुळेच या अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जातो.
मराठी भाषिकांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळावाबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी माजी आमदार किणेकर आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा उद्देश जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केला. तसेच महामेळाव्याचे आयोजन आणि त्यासाठीच्या परवानगी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.