Special Report | मलकापुरात उपनगराध्यक्षांच्या वाढदिवसाला नाचवल्या तलवारी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा : मलकापूर उपनगराध्यक्ष हाजी राशिदखॉं जमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल रात्री आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात 40 ते 50 तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन नृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री 9.30 च्या सुमारास मलकापूर शहरातील पारपेठ भागातील नगर परिषद उर्दू शाळा क्र. 2 च्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला मलकापुरचे नगराध्यक्ष हरीश रावळ हे देखील उपस्थित होते. या सर्वांसमोर 40 ते 50 तरुणांनी हातात तलवारी घेऊन अक्षरशः बेधुंद डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच व पोलिसांना यांची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तिथे पोहचून हा कार्यक्रम बंद पाडला. सकाळी एबीपी माझावर हे वृत्त प्रदर्शित होताच पोलीसांनी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे आणि पाच तलवारी जप्त केल्या आहेत.
या आरोपींवर आर्म अॅक्टनुसार गुन्हा देखील नोंद झालाय. पोलिस व्हिडीओतील इतर आरोपींच्या शोधात आहेत. दरम्यान दुपारी एबीपी माझाने वृत्त लावून धरल्याने पोलिसांनी हाजी राशिदखॉं यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.