Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
ही बातमी पण वाचा
Suresh Raina on Suryakumar Yadav : 'दादा' ठरला असता एक्स फॅक्टर, संघात 'सूर्या' नसल्यानं भारताला फटका? माजी खेळाडूचा BCCI वर संताप
Team India squad Champions Trophy 2025 : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणाऱ्या 6 खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन यांचा समावेश आहे. तर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवची संघात निवड झाली नाही म्हणून माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना बीसीसीआयवर चांगलाच संतापला.
सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, जर सूर्यकुमार संघात असता तर तो एक्स फॅक्टर असता. संघाला त्याची उणीव भासेल. आता जबाबदारी सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या टॉप तीन फलंदाजांवर असेल. सूर्यकुमार असा खेळाडू आहे जो मैदानावर कोणत्याही ठिकाणाहून शॉट मारू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो
भारतासाठी सूर्याने खेळले 37 एकदिवसीय सामने
सूर्यकुमार यादव हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात शॉट मारण्याची क्षमता आहे. त्याने 2021 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये 773 धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.