Special Report | क्वारंटाईनच्या भीतीनं घरातच ठेवला मृतदेह, विरार पश्चिममधील धक्कादायक घटना
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा
Updated at:
04 Aug 2021 09:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या भीतीने एका 72 वर्षीय व्यक्तीचा 3 दिवस मृतदेह कुटुंबीयांनी घरातच ठेवला होता. तर त्याच्या एका मुलीनेही समुद्रात जाऊन आत्महत्या केली होती. आज बुधवारी सकाळी तिच्या दुस-या बहीणीने समुद्रात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचविण्यात आले. आणि वाचलेल्या तरुणीच्या माहितीवरुन हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही सर्व घटना कोरोनाची भीती, आर्थिक विवंचना, आणि कौटुंबिक वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे