ABP News

Special Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?

Continues below advertisement

Special Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?

ही बातमी पण वाचा

Sharad Pawar: गौतम अदानींच्या घरी अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? शरद पवार म्हणाले, 'सरकार स्थापन...'

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीबाबतची माहिती एका मुलाखतीवेळी दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर आता गौतम अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. शरद पवार यांनी अदानींच्या घरी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या (Amit Shah) भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी या भेटीमध्ये नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

नेमकं काय म्हणालेत शरद पवार?

एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले, "एखादा उद्योजक माझ्याकडे आला, त्यांनी राज्याच्या भल्यासाठी काम करायला तयार असेल, तर मी त्यांना मदत करेन, पंरतु, त्यांनी तुम्ही अमक्याला तिकीट द्या, असा पक्षाचा जाहीरनामा करा, असं काही राज्याच्या भल्याचं सोडून जर सांगितले तर मी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेन. उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही," असं शरद पवार म्हणाले. 

"2019 मध्ये महाविकास आघाडी तयार होण्याआधी सत्तास्थापनेसाठी भाजपंबरोबरच्या चर्चेसाठी शरद पवारांसह उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी अमित शहा यांची भेट घेतली होती," असं अजित पवार यांनी एका मुलाखतीवेळी बोलताना म्हटलं होतं. त्याबाबत शरद पवार म्हणाले, "सरकार स्थापन झालं का ? मग अशा चर्चांना काय अर्थ आहे? अजित पवारांसोबत गौतम अदानींची भेट घेतली होती, मात्र, त्या भेटीमागचा उद्देश फक्त प्रकल्पांविषयी माहिती देणं होता. उद्योगपतींच्या घरी जाणं काही चुकीचं नाही, मी अनेक वेळा रतन टाटा यांच्या घरी गेलो आहे. किर्लोस्करांच्या घरीही अनेकदा गेलो होतो. औद्योगिक प्रगतीसाठी सुसंवाद आवश्यक" असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. 

अमित शहांच्या भेटीबाबत शरद पवार म्हणाले, ते देशाचे गृहमंत्री असल्यामुळे मी त्यांना तीन-चार वेळा भेटलो आहे. महाराष्ट्रातील ऊस दराबाबत मी शिष्टमंडळ घेऊन भेटीसाठी गेलो होतो. राज्यात असलेल्या प्रश्नांच्या समाधानासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणं गरजेचं असतं, असंही पुढे शरद पवारांनी म्हटलं आहे. त्या भेटीमध्ये सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झाली असती तर आमचे सरकार आलेलं तुम्हाला दिसलं असतं. पण यातील एकही गोष्ट सत्यात उतरली दिसली नाही. त्यामुळे अशा प्रश्नांनाही काही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी भेटीबाबत दिलं आहे.

निवडणुका आणि तो काळ सोडला तर नंतर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत, असे मी म्हणालेलो नाही, ही गोष्ट खरी आहे. त्याचबरोबर मी अनेक वेळा अजित पवार यांना घेऊन मी अदानी यांची भेट घेतली आहे, हे खरं आहे. अजित पवार यांना माहिती मिळावी  हा त्यामागचा हेतू होता, असंही पुढे शरद पवारांनी म्हटलंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram