Special Report Mumbai Air Pollution : मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार?कृत्रिम पावसाचा फायदा काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई... मायानगरी... देशाची आर्थिक राजधानी... धावतं शहर... घड्याळाच्या काट्याला आणि कॅलेंडरच्या आकड्यांना टांगलेलं आयुष्य... ही आणि अशी अनेक वर्णनं मुंबापुरीबद्दल केली जातात... मात्र त्यात आता भर पडलीय... धुळीचं साम्राज्य असलेलं, प्रदूषणाच्या जाळ्यात अडकलेलं शहर... अशी आता मुंबईची ओळख बनू लागलीय... लोक खोकतायत, तापाने फणफणतायत, श्वास गुदमरू लागलाय... कारण, जिथं पाहावं तिथं आणि २४ तासांतील कोणत्याही वेळेला मुंबईत दिसतं ते फक्त आणि फक्त प्रदूषण... मात्र या प्रदूषणावर उतारा म्हणून रस्त्यांवर पाण्याची फवारणी केली गेली, रस्ते स्वच्छ केले गेले... आता तर मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचाही विचार सुरू झालाय... मात्र ते तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का?, कृत्रिम पावसाने नव्या समस्यांचा डोंगर तर उभा राहणार नाही ना? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जाऊ लागलेयत... त्याच प्रश्नांता धांडोळा घेणारा, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...