Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन

समाजवादी पार्टीचे बडे नेते Azam Khan गेल्या दोन वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांना काल शेवटच्या गुन्ह्यातही जामीन मिळाल्यामुळे आज त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. Azam Khan यांच्याविरुद्ध शंभरहून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. यातले चौऱ्याऐंशी गुन्हे दोन हजार सतरा नंतर आलेल्या BJP सरकारच्या काळातले आहेत. नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी बारा गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे किंवा निर्दोष सुटका झाली आहे. या बारा गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांमध्ये त्यांची निर्दोष सुटका झाली आहे, तर उर्वरित सहा गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. या जामिनामुळे Azam Khan यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या सुटकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola