Special Report Jalna : जालन्यातील जांबसमर्थ श्रीराम मंदिरात पुन्हा एकदा आनंदसोहळा : ABP Majha

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यातील तीर्थक्षेत्र जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरात पु्न्हा एकदा रामनामाचा जयघोष होणार आहे. ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय.. समर्थ रामदास स्वामींचे देव पुन्हा एकदा या मंदिरात विराजमान होणार असल्याने जांबसमर्थमध्ये उत्साहाचं वातावरण आहे... समर्थांच्या राम मूर्तीचा आज पुनर्स्थापना सोहळा होणार आहे.. प्रभू श्रीरामाची मिरवणूक निघणार आहे. या निमित्त आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. उद्या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे.. ऑगस्ट महिन्यात समर्थ रामदास स्वामी पूजा करत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या.. तब्बल दोन महिन्यांच्या तपासानंतर या मूर्ती चोरीचा छडा लावण्यात यश आलं... चोरट्यांनी चोरलेल्या मूर्ती पोलिसांनी जप्त केल्यात.. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलीय...