Zero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha
पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी काल अटक केली आणि कोर्टानं आज त्याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोेग यांना मारणेच्या गुंडांनी १९ फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याचा आरोप आहे. जोग यांनी घडलेला प्रकार मोहोळ यांना सांगितला आणि त्यामुळंच तपासाची चक्र वेगानं फिरली आणि गजा मारणेला अटकही झाली. या घटनेच्या निमित्तानं गजा मारणे आणि त्याच्या राजकीय लागेबांध्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वीच आपण सर्वपक्षीय नेत्यांना गजा मारणेची भेट घेताना पाहिलं होतं. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आणि अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार.. या सर्वांनी मारणेची भेट घेतली. पुण्याच्या कोथरुड परिसरात गजा मारणेची दहशत आहे आणि त्या मतदारसंघातील निवडणुकीसाठी राजकीय नेते त्याची मदत घेतात, हे ओपन सिक्रेट आहे. कदाचित म्हणूनच, याआधी तीनवेळा मोक्का लागूनही मारणे बाहेर आला. गेल्या खेपेला तर त्यानं तळोजा जेलमधून सुटल्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून स्वतःची मिरवणूक काढली होती. त्यामुळं प्रश्न पडतो की, आपल्या ओळखीचे नेते आपलं हे कृत्य सांभाळून घेतील याची खात्री असल्याशिवाय मारणेनं ही मिरवणूक काढली का? ज्याच्यावर २५हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, तो ५० गाड्यांचा ताफा मिरवत मिरवणूक काढतो आणि सारी यंत्रणा ती मिरवणूक आणि एकमेकांची तोंडं बघत बसते. मंडळी, गजा मारणेसारखे हे गुंड सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. तलवारी नाचवतानाचे, मिरवणूक काढल्याचे व्हिडिओ ते पोस्ट करत राहतात. त्यामुळं कोवळ्या वयातली मुलं त्यांच्या प्रभावाखाली येतात. अलीकडे पुण्यातले अनेक गंभीर गुन्हे हे अतिशय कमी वयाच्या मुलांनी मारणेसारख्यांच्या नजरेत येण्यासाठी केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झालीय. आणि म्हणूनच या घटनेविषयी आज चर्चा करणं महत्त्वाचं आहे. चर्चेला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.