Maharashtra Gram Panchayat Election | 70 वर्षांच्या आजी गावाच्या 'कारभारीण' | Special Report
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
14 Feb 2021 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चिपळूण (रत्नागिरी) : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि त्यांचे निकालही लागले. त्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडतही झाले. काही गावांमध्ये पती-पत्नी सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले. तर काही गावात तरुण-तरुणींच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यामधल्या ओवळी गावात 70 वर्षांच्या आजीबाई सरपंच बनल्या आहेत. आदिवासी कातकरी समाजामधील 70 वर्षांच्या आजीबाई आता पुढील पाच वर्षे ओवळी गावाचा कार्यभार पाहणार आहेत.