Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब, मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?

Continues below advertisement

Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर विजय मिळवलाय. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री भाजपचाच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली जात आहे. त्यातच भाजपने निकालापूर्वी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदाचा शब्द दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram