Special Report MP Suspended :आत्तापर्यंत एकूण 141 खासदारांचं निलंबन, इतिहासात पहिल्यांदा मोठी कारवाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Parliament MP Suspended : आत्तापर्यंत एकूण 141 खासदारांचं निलंबन, इतिहासात पहिल्यांदा मोठी कारवाई
Parliament Winter Session 2023: नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे मंगळवारी (19 डिसेंबर) आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. आज संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. तसेच, लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय संसदेच्या इतिहासात खासदारांवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं संबोधलं जात आहे. राज्यसभा आणि लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या सर्व खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे.