Solapur : सोलापुरात आमदार पुत्रांच्या विवाह सोहळ्याला हजारोंची गर्दी, कोरोना नियम धाब्यावर
आफताब शेख, एबीपी माझा | 26 Jul 2021 10:47 PM (IST)
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप ही पूर्णपणे ओसरलेली नाही. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता देखील तज्ञांकडून व्यक्त होतेय. त्यामुळे राज्यात अद्याप ही निर्बंध कायम आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील संध्याकाळी चार नंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. तर शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधीची हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.