Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sneha Dubey Reply to Imran Khan : इमरान खान यांना भिडणारी वाघीण Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSneha Dubey: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्नेहा दुबेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत स्नेहा दुबे म्हणाल्या की, पाकिस्तान भारताविरुध्द खोटे बोलत आहे. पाकिस्तान हा दहशतवादी संघटनेला प्रोत्साहन देत असतो. भाग आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी मुक्तपणे फिरत असतात. लादेनने भारताला भयंकर त्रास दिला असलातरी पाकिस्तान आणि इम्रान खान लादेनचा गौरव करतात. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे केंद्रशासित प्रदेश कायम भारताचे अविभाज्य भाग असतील, असं जोरदार प्रत्युत्तर देत संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचा भारताविरुद्धचा दुष्प्रचार हाणून पाडला. त्यासाठी त्यांनी राईट ऑफ रिप्लाय या संसदीय आयुधाचा वापर करत इम्रान खान यांच्या भाषणावर भारताचा प्रतिसाद नोंदवला आणि एका महत्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या विरोधातील प्रचार थांबवला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत ऑनलाईन पद्धतीने आपलं मत मांडलं. पाकिस्तानला शांतता हवी आहे, पण जम्मू काश्मीरचा प्रश्न सुटल्याशिवाय दक्षिण आशियातील शांतता प्रस्थापित होणार नाही, असं सांगून इम्रान खान यांनी काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. त्याला उत्तर देताना त्यांनी पाकिस्तान कसा आगालाव्या आहे पण जागतिक व्यासपीठावर बोलताना ते आग विझवणारे असल्याच्या अविर्भावात बोलतात, हेही ठणकावून सांगितलं. पाकिस्तानी नेते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिमा डागाळतात आणि मूळ मुद्द्यावरुन जागतिक समुदायाचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात, असं सांगून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती तसंच पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीची जगाला कल्पना असल्याचं सांगितलं. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहेत, तरीही भारताचे देशांतर्गत प्रश्न पाकिस्तानकडून जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न वारंवार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानातील अस्थिर शासनव्यवस्थेचा हवाला देऊन स्नेहा दुबे यांनी भारतात स्वतंत्र प्रसारमाध्यमे आणि स्वायत्त न्यायव्यवस्था असल्याचंही स्पष्ट केलं. भारतीय न्यायव्यवस्था भारतीय संविधानाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. दुबेंनी पाकला खडसावत म्हटलं की, पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यापारदेखील होत असतो. त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानच्या नेत्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा चुकीचा प्रसार करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी बऱ्याचदा त्यांनी भारताची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रचंड खेदाची गोष्ट आहे.स्नेहाने सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर केला होता. तिला तो व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. कमी वयात संयूक्त राष्ट्रंच्या महासभेत त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराने तिचे कौतूक होत आहे.