ट्रॅक्टरमधून एकाचवेळी डवरणीसह फवारणी, यवतमाळच्या शेतकऱ्याची युक्ती, खर्चात मोठी बचत होणार!
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा Updated at: 08 Jul 2021 09:04 PM (IST)
दिनेश परडखे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याला राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत लहान ट्रॅक्टर मिळाला होता. त्या ट्रॅक्टरची चाकं काढून त्याने कर्नाटकहून खास चाकं बनवून आणली. ही चाकं चिखलात फसत नाहीत. दिनेश ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी, डवरणी इतकंच नव्हे तर इतरही शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करून अधिक नफा मिळवतो. यात मनुष्यबळ कमी लागत आहे आणि त्यामुळे शेती खर्चात बचत होत आहे.