Nagpur महापालिकेत घोटाळा? कूलर, यू पिन, फोल्डर, पेन स्टॅण्ड सगळ्याच वस्तूंच्या खरेदीत भ्रष्टाचार
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
28 Dec 2021 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : नागपूर महानगरपालिकेत घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप सहारे यांनी हा घोटाळा उघडकीस आणलाय. कूलर व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरु असतानाच आणखी एक घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.