संपर्कहीन गावांपर्यंत मदत कधी पोहोचणार? साताऱ्यातल्या येरणे गावात विध्वंस,घरं,जनावरं सगळं वाहून गेलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2021 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील 9 जिल्ह्यामध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. सर्व नुकसांनीची माहिती घेतली जात आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.