Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Gondia : गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने (Congress) काल आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान काँग्रेसचे भंडारा-गोंदियाचे (Bhandara Gondia Lok Sabha) खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याची भाषा केली होती. यावर विधान परिषद सदस्य परिणय फुके (Parinay Phuke) यांना विचारले असता ज्याप्रमाणे लोकसभेत फक्त 100 जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना अहंकार आला आहे. तसा अहंकार येथील खासदार प्रशांत पडोळे यांनी आणू नये, असा सल्ला दिला आहे. काय म्हणाले होते खासदार प्रशांत पडोळे? मुंबई-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. यामुळे सर्विस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते. याच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 'जागो सरकार जागो' हे आंदोलन करण्यात आले होतं. या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी NAHI अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले. खासदार प्रशांत पडोळे स्वतः रेल्वे रुळावर बसले होते. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यांनतर NAHIच्या अधिकार्यांनी तीन दिवसात हे खड्डे बुजून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र या आंदोलन दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना खडसावत असताना काम पूर्ण झाले नाही तर तुम्हाला जमिनीत गाडू, असा इशारा खासदार पडोळे यांनी NAHIच्या अधिकाऱ्यांना दिला होता. यावर आज परिणय फुके यांनी खासदार प्रशांत पडोळे यांना सल्ला दिला आहे.