Sanjay Raut Vs Sharad Pawar : पवारांचे गोडवे, संकेत नवे? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? Special Report
Sanjay Raut Vs Sharad Pawar : पवारांचे गोडवे, संकेत नवे? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? Special Report
राजकारणात एक आठवडा खूप मोठा कालावधी मानला जातो. पडद्यामागे इतक्या घडामोडी घडत असतात की कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही. आता हेच बघाना कालपर्यंत जे संजय राऊत शरद पवारांना दैवतासारखं भजत होते ते पवारांवरच नाही तर सुप्रियाताईंवर सुद्धा टीकेची एक संधीही सोडत नाहीयत, जे फडणवीस पवारांना फोडाफोडीचे महारथी म्हणायचे ते आता त्यांची स्तुती करत आहेत तर ज्यांच्यावरुन महाविकास आघाडीत कंपनं सुरु आहेत ते शरद पवार ऑपरेशन सिंदूरवरुन केंद्र सरकारच्या मागे ठामपणे उभा आहेत. काय सुरु आहे नेमकं ते पाहुयात
अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर अशी टीका करत होते.
पक्ष आणि परिवार फोडण्यात शरद पवार महारथी- भीष्म पितामह आहेत असा टोला त्यांनी लगावला होता.
व्होट जिहादचा मुद्दा असो, पक्षफोडाफोडीचा असो किंवा मराठा आरक्षणाचा असो, मारकडवाडी असो, जातीवादी राजकारण असो वेगवेगळे मुद्दे घेत देवेंद्र फडणवीसांनी वेळोवेळी शरद पवारांच्या भूमिकांवर सडकून टीका केलीय.
शरद पवारांनीही हातचं न राखता आपल्या सामान्य कार्यकर्त्याला आवडेल अशा पातळीवर जाऊन फडणवीसांना लक्ष्य केलंय
हा सगळा अगदी ताजा इतिहास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जेव्हा शरद पवारांची स्तुती करतात तेव्हा चर्चा तर होणारच...
फडणवीसांनी शरद पवारांची स्तुती केली पण मिरच्या झोंबल्या एकेकाळी कट्टर साहेबप्रेमी असलेल्या संजय राऊतांना...
शरद पवार समजायला १०० जन्म घ्यावे लागतील असं जे संजय राऊत सांगत होते, शरद पवारांची स्तुती नाही करायची तर कोणाची करायची असा प्रश्नही राऊत विचारत होते. आता मात्र फडणवीसांनी पवारांची स्तुती करणं राऊतांना फारसं रुचलेलं नसावं. आजची संधी साधत संजय राऊतांनी पवारांची दुखती नस पकडायचाही प्रयत्न केला. त्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं.
पण एकीकडे फडणवीसांकडून पवारांची स्तुती आणि त्याचवेळी राऊतांकडून सुळेंबाबत सत्तेची तहान लागण्याचा शब्दप्रयोग, हे राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झालीय...
GFX IN
हेडर - पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
- पडद्यामागे राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या काहीतरी हालचाली सुरु आहेत असं राऊतांना वाटतंय का?
- विलीनीकरणाबाबतचा निर्णय आपल्या पक्षातील नेतेच घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.
- पवारांच्या एका गटाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जायचंय तर दुसऱ्या गटाला थेट भाजपसोबत जुळवून घ्यायचंय
- शरद पवार आणि अजित पवारांच्या गेल्या काही दिवसांपासून उघड भेटी, चर्चा आणि व्यासपीठावर एकत्र येणं या चर्चांना आणखी दुजोरा देणारं आहे.
- शरद पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर प्रकरणी केंद्र सरकारला पाठींबा देणं, सुप्रिया सुळेंचं आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणं या भूमिका ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे
GFX OUT