Raut vs Shinde Special Report : निवडणुकांच्या कसोटीत पैशांचा खेळ? राऊत - लंकेंचे गंभीर आरोप!

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची धावपळ सुरु असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे त्यांनी म्हटले. राज्याच्या विविध भागांमध्ये भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. मात्र, आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ नाशिकमधील आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस... दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपाला आता सत्ताधारी नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.