शाळेच्या दाखल्यानुसार समीर वानखेडे मुस्लिम? वानखेडे कुटुंबाकडून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSameer wankhede certificate : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा आता शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावेळी सोशल मीडियात व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे असा इशारा देखील वानखेडे यांनी दिला होता. त्यामुळे आज, गुरुवार सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्या बाबत वानखेडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव असल्याचं पाहिला मिळत आहे. शिवाय यावर समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं देखील निदर्शनास येत आहे. एक दाखला सेंट जोसेफ हायस्कूल वडाळा, तर दुसरा सेंट पॉल हायस्कूल दादर या शाळांचा आहे. त्यामुळे या दोन्ही दाखल्यांबाबत आणि यावर उल्लेख असलेल्या धर्मा बाबत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.