Saamana on MVA | सामनाच्या अग्रलेखात इंडिया आघाडीची काळजी? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेनंतर इंडिया आघाडीतील बिघाडी सतत समोर आली आहे आणि आता दिल्ली विधानसभेच्या निमित्तान आम आदमी पक्ष आणि काँग्रेस मध्ये कलगीतुरा रंगलाय त्याची काळजी ठाकरेंच्या सामनान आग्रलेखामधून व्यक्त केली आहे. संवादाच्या नावान इंडिया आघाडीमध्ये ठणाणा असल्याची टीका सामनाने केली आहे. काँग्रेसन मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेस याला प्रतिसाद देईल का? इंडिया आघाडीचा अस्तित्व किती दिवस टिकेल? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.
सामनातून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला हात जोडून विनंती करण्यात आली आहे. इंडिया आघाडी शाबूत ठेवण्यासाठी पुढाकार घ्या अशी ती विनंती आहे. प्रादेशिक पक्षांना अस्तित्व टिकवायच आहे हे समजून घ्या अशी ती विनंती आहे. आपल्या घटलेल्या शक्तीची जाणीव ठेवा अशी ती विनंती आहे. मित्र पक्षांसोबत संवाद ठेवा अशी ती विनंती आहे. या सगळ्याला कारण ठरलं दिल्लीत काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्षात सुरू असलेली राजकीय लढाई. गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे. डायलॉग हवा तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही. देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीन.