Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

Continues below advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय रावत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्वर ओकवर दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिट चर्चा झाली आहे. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर या दोघांची भेट होती आणि त्यानंतरच आता या दोघांमध्ये आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मवयाच भवितव्य काय असणार याबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. अपडेट जाणून घ्या ..

हे देखील वाचा

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; मुख्यमंत्र्यांची मागणी कृषीमंत्र्यांकडून मान्य; सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Soybean : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. 
यापूर्वी ही खरेदी आजपर्यंत म्हणजे 13 जानेवारी पर्यंत करण्याचे होते निर्देश होते. आता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री चौहान यांना फोन करतक मदतवाढ देण्याची मागणी केला होती. त्यांच्या या मागणीला यश आलं आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंहे चौहान यांनी हा निर्णय घेतला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram